Belgaum fuel shortage | पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा : डीसी Pudhari
बेळगाव

Belgaum fuel shortage | पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा : डीसी

पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही, असे स्पष्ट करत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : जिल्हा आणि शहरात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही, असे स्पष्ट करत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मंगळवारी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, एखाद्या पेट्रोल पंपावरील साठा संपल्यास अवघ्या पाच तासांत तिथे नवीन साठा उपलब्ध करून देण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्या आणि पंप मालकांशी यापूर्वीच चर्चा झाली असून, पुरवठा साखळीत कोठेही अडथळा नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकांनी घाबरून जाऊन अनावश्यक इंधन साठवणूक करू नये. कोणत्याही पेट्रोल पंपावर कॅन किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. केवळ वाहनांमध्येच इंधन भरून दिले जाईल. सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून इंधन टंचाईबाबत खोटी माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे रोशन यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनीही प्रशासकीय भूमिकेची माहिती दिली. अवैध इंधन साठवणूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिस प्रशासन कडक बंदोबस्त ठेवणार आहे, असे सांगितले. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपसंचालक मल्लिकार्जुन नायक आणि हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष अजय पै उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT