Pudhari
बेळगाव

Nipani Crime: निपाणीत वॉकिंगला निघालेल्या महिलेचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास

निंबाळकर कॉलनीत दुचाकीवरून आलेल्या दोघांचा धाडसी डल्ला; सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : शहरातील निंबाळकर कॉलनी परिसरात बुधवारी रात्री वॉकिंगसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे तीन लाख रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

निंबाळकर कॉलनीतील रहिवासी रिहाना मुल्ला या इतर महिलांसोबत बुधवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास वॉकिंग करत होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी अचानक त्यांच्यावर झडप घातली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दोघेही दुचाकीवरून वेगाने पसार झाले. चोरीस गेलेल्या मंगळसूत्राची किंमत सुमारे तीन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

घटनेनंतर महिलेचे पती रिझवान मुल्ला यांनी निपाणी बसवेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी तसेच महिलेच्या घरी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT