निपाणी : येथील व्हीएसएम सोमशेखर आर. कोठीवाले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निपाणी येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रिक कन्स्ट्रक्शन ट्रॉली’ या नावीन्यपूर्ण प्रकल्पाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाइन पेटंट प्रमाणपत्र मंजूर केले आहे. संस्थेचे सीईओ डॉ. सिद्दगौडा पाटील, प्राचार्य डॉ. उमेश पाटील, प्रा. बसवराज करोशी, डॉ. वीरेश मठद यांची उपस्थिती होती.
व्हीएसएम सोमशेखर आर. कोठीवाले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निपाणी येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाइन पेटंट प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
या प्रकल्पाच्या डिझाइनची नोंदणी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयात क्रमांक 507898-001 अंतर्गत करण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्रात साहित्याची वाहतूक करणे, कामगारांचे शारीरिक श्रम कमी करणे आणि बांधकाम साहित्य हाताळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. विद्युत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकाम क्षेत्रातील वाहतुकीसाठी उपयुक्त साधन विकसित करण्याचा विद्यार्थ्यांचा हा प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहे.
या प्रकल्पासाठी प्रा. कैलास पठाडे यांनी मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील आनंदा गणेश पाटील, अरमान कुतुबुद्दीन मुल्ला, अभिषेक संजय खोत आणि धीरज राजू अलकनुरे यांची नावे पेटंट प्रमाणपत्रावर नोंदविण्यात आली आहेत. या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष सहकाररत्न चंद्रकांत कोठीवाले, अध्यक्ष सी.ए. तारळे, उपाध्यक्ष इंजिनिअर सुनील पाटील, रजत ढोले, उपाध्यक्ष पप्पूअण्णा पाटील, सचिव समीर बागेवाडी, सर्व संचालक, यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले.