बेळगाव

Nipani Shop Burglary: निपाणीत दुकान फोडले; ७ लाखांचा ऐवज लंपास

शहराबाहेरील बेळगाव नाका ईदगाह माळ पंत मंदिरला लागून असलेले इलेक्ट्रिकल मोटर सेल्स अँड सर्व्हिस दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ७ लाखांचा ऐवज लंपास केला

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : शहराबाहेरील बेळगाव नाका ईदगाह माळ पंत मंदिरला लागून असलेले इलेक्ट्रिकल मोटर सेल्स अँड सर्व्हिस दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ७ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. घटनास्थळी शहर पोलिसांनी भेट देऊन तपास चालविला आहे.

यरनाळ (ता. निपाणी) येथील महावीर गणपती पत्रावळे यांचे पंत मंदिर शेजारी हे दुकान आहे. या ठिकाणी पत्रावळे हे मोटर, वायरिंग मोटर रिपेरिंग, जनरेटर रिपेरिंग, सबमर्सिबल पंप रिपेरिंग, विक्रीचे कामे करतात. बुधवारी दिवसभर पत्रावळे नेहमीचे काम आटोपून दुकान बंद करून गेले असता चोरट्यांनी मध्यरात्री शॉपच्या मागील खिडकीचा गज वाकवून आतमध्ये प्रवेश केला.पत्रावळे सकाळी दुकानात आल्यानंतर ही घटना लक्षात आली.

चोरट्यांनी आतमधील कॉपर नवीन व जुने तांब्याचे धातू तांबे शिवाय दुरूस्‍त केलेल्या मोटरी तसेच नवीन मोटरी व इतर साहित्य असा एकूण ७ लाखांचा ऐवज लंपास केला. चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी हे कृत्य घडवून आणले असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. मुख्य रस्त्यावरील दुकान चोरट्यांनी फोडल्‍याने व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पत्रावळे यांनी शहर पोलिसांत याची माहिती दिली असून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास चालवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT