वादळी वाऱ्याचा फटका, ११० के. व्ही लाइन तुटल्याने निपाणी शहर ८ तास राहणार अंधारात!  
बेळगाव

Nipani Power cut | वादळी वाऱ्याचा फटका, ११० के. व्ही लाइन तुटल्याने निपाणी शहर ८ तास राहणार अंधारात!

पाऊस-वाऱ्यामुळे चिकोडी २२० केव्ही स्टेशन ते निपाणी लाइनचा कंडक्टर तुटला; उद्या पाणीपुरवठाही होणार विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

निपाणी:पुढारी वृत्तसेवा पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे निपाणी शहराचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. २०० केव्ही चिकोडी स्टेशन ते ११० केव्ही निपाणी स्टेशन दरम्यानची मुख्य लाइनचा कंडक्टर तुटल्याने निपाणी वीजपुरवठा ८ तास खंडित राहणार असल्याची माहिती हेस्काॅमचे शहर अभियंता अक्षय चौगुला यांनी दिली.

हेस्काॅम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा बंद झाला आहे. तुटलेला कंडक्टर जोडणे आणि लाइन सुरळीत करणे यासाठी किमान ८ तासांचा कालावधी लागणार आहे.हेस्काॅमचे कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत.यामध्ये वीजपुरवठा नसल्याने निपाणी नगरपालिकेच्या पाणी उपसा केंद्रांनाही फटका बसला आहे.

त्यामुळे आज शनिवारी व रविवारी शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठा व्यत्यय येणार आहे. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.वीज पूर्ववत झाल्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू केला जाईल. दुरुस्तीच्या कामाची माहिती हेस्काॅमकडून वेळोवेळी दिली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT