निपाणी : पुढारी वृत्तसेवा नवीन पोल उभारणीसह तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम चालणार असल्याने उद्या रविवार दि.२३ रोजी सकाळी १० ते ६ या वेळेत निपाणी शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित राहणार आहे अशी माहिती शहर अभियंते अक्षय चौगुला यांनी दिली.
निपाणी विभागात येणाऱ्या कोगनोळी सबस्टेशन वगळता निपाणी शहर (समाधीमठ) बेनाडी व जत्राट सब स्टेशन अंतर्गत तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम चालणार आहे.त्यामुळे वरील वेळेत निपाणी औद्योगिक वसाहतीसह शहर, उपनगर तसेच जत्राट व बेनाडी विद्युत उपकेंद्र कक्षेत येणाऱ्या गावातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे.तरी नागरिक,उद्योजक व व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमच्यावतीने करण्यात आले आहे.