Gold theft case Pudhari
बेळगाव

Gold theft case: निपाणी पोलिसांची हरियाणात धडक कारवाई; दोघांकडून महिला प्रवाशांचे १२ तोळे सोने जप्त

तपास पथकाचा जि. पो. प्रमुखांकडून गौरव

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : बसस्थानकावरून महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघा चोरट्यांना निपाणी येथील बसवेश्वर चौक पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईसाठी पोलिसांनी तब्बल दहा दिवस हरियाणात मुक्काम ठोकून तपास केला. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी शनिवारी विशेष पथकाचा सत्कार करून गौरव केला.

दि. १२ मार्च रोजी कल्पना कळसकर (रा. पणदे कॉटर्स) या आपल्या मैत्रिणीसह पुणे येथे विवाह समारंभासाठी बसने जात होत्या. यावेळी त्यांच्या बॅगेत ठेवलेले दागिने बसमध्ये आधीच असलेल्या सोनू थेलू व सतीश सुलता (रा. हरियाणा) या दोघा चोरट्यांनी चोरून चिकोडी येथे पसार झाले.

घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक रमेश पवार तसेच एलसीबी पथकातील हवालदार एम. ए. तेरदाळ, एम. एफ. नदाफ, राजू दिवटे, पी. एम. हिरेमठ यांनी अवघ्या पाच तासांत संशयितांचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत या दोघांनी आणखी दोन साथीदार फरार असल्याची माहिती दिली. त्यानुसार तपास पथकाने हरियाणात जाऊन १० दिवस सखोल तपास केला. या कारवाईत कळसकर यांच्यासह अन्य दोन महिलांचे सुमारे ११ लाख रुपये किमतीचे १२ तोळे सोने जप्त करण्यात आले.

या गंभीर प्रकरणाचा शिताफीने तपास लावल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी बेळगाव येथील जिल्हा मुख्यालयात संबंधित पथकाचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत घटनेची सविस्तर माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT