बेळगाव

Nipani Police Raid: निपाणीत पोलिसांचे पहाटे छापासत्र

एक तलवार तसेच नोंदणी नसलेली मोटारसायकल जप्त

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने निपाणी पोलिसांनी बुधवारी पहाटे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या घरांवर छापासत्र राबविले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एक तलवार तसेच नोंदणी नसलेली मोटारसायकल जप्त केली आहे.

जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. सीपीआय बी. एस. तळवार यांच्या नेतृत्वाखाली विविध भागांत धडक कारवाई केली.या मोहिमेत १५ हून अधिक संशयित व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या घरांची तपासणी करण्यात आली.

या कारवाईदरम्यान अरबाज राजमहमद सय्यद (रा. साखरवाडी) यांच्या घरात तलवार आढळून आली. तसेच शैलेंद्र बोधले (शिंत्रे कॉलनी) यांची नोंदणी नसलेली मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहे. शहर पोलिसांनी शहरासह उपनगरातील विविध भागांत तपासणी केली. बसवेश्वर चौक पोलिसांनी हणबर गल्ली, आदर्श नगर परिसरात ग्रामीण पोलिसांनी अकोळ व कुर्ली तर खडकलाट पोलिसांनी खडकलाटसह चिखलव्हाळ, वाळकी आणि पट्टणकुडी परिसरात छापे टाकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT