मृत प्रशांत गायकवाड 
बेळगाव

Nipani news | नोकरी नसल्याने लग्न ठरेनाः माणकापूरच्या पदवीधर युवकाने हंचीनाळमध्ये घेतला गळफास!

युवकाचे डीएड शिक्षण, इचलकरंजी येथे खासगी शिक्षण संस्थेत होता शिक्षक

पुढारी वृत्तसेवा

निपाणी: नोकरी मिळत नाही व विवाह ठरत नसल्याने माणकापूर (ता.निपाणी) येथील पदवीधर युवक प्रशांत तायगोंडा गायकवाड (वय ३८ ) या युवकाने आपल्या मूळगावी हंचीनाळ,के.एस.(ता.निपाणी) येथे गळफासाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.घटनेची नोंद ग्रामीण पोलीसात झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की,मयत प्रशांत गायकवाड याचे मुळगाव हंचीनाळ (केएस) ता.निपाणी असून तो आपल्या कुटुंबियासमवेत माणकापूर येथे मामाच्या गावी राहावयास होता.त्याचे डीएड (पदवीपर्यंत) शिक्षण झाले होते.शिवाय त्याने एमपीएससीची परीक्षाही दिली होती.सध्या तो इचलकरंजी येथे एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सेवेत होता.दरम्यान त्याला कायमस्वरूपी नोकरी मिळत नसल्याने शिवाय लग्न ठरत नसल्याने तो मानसिक तणावाखाली वावरत होता.

दरम्यान प्रशांत हा शनिवारी आपल्या आई समवेत दुचाकीवरून मूळगावी हंचीनाळ,केएस येथे चुलते (काकांच्या) घरी आला होता.रविवारी सकाळी तो दुचाकीवरून बाहेर जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र तो बराच वेळ घराकडे परतला नाही.

दरम्यान त्याने आपले चुलते बाळासाहेब सदाशिव गायकवाड यांच्या जनावरांच्या गोठ्यातील छताला दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.याची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली.त्यानुसार घटनास्थळी सीपीआय बी.एस.तळवार,उपनिरीक्षक शिवराज नायकवडी,हवालदार सलीम मुल्ला, परमानंद मारूशेठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

याबाबत मयत प्रशांत यांचा भाऊ प्रवीण गायकवाड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.दरम्यान पदवीधर प्रशांत गायकवाड यांनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT