बंगळूर : डीएसपी संतोष सत्यनायक यांना मुख्यमंत्री पदकाने गौरविताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या शेजारी गृहमंत्री जी.परमेश्वर व इतर 
बेळगाव

Nipani News : डीएसपी संतोष सत्यनायक यांचा मुख्यमंत्री पदकाने सन्मान

२७ वर्षांच्या निष्ठावान सेवेला राज्याचा मान : निपाणीकरांमध्ये अभिमानाची भावना; राज्यातील १५३ जण सन्मानित

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : बेळगाव येथील मार्केट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त (डीएसपी) संतोष सत्यनायक यांना राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आले. बंगळूर येथे गुरुवारी झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते हा गौरव प्रदान करण्यात आला. यावेळी गृहमंत्री जी. परमेश्वर, राज्याचे पोलीस महासंचालक एम. ए. सलीम, तसेच गृह खात्याचे सचिव तुषार गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

या सन्मानाबद्दल बोलताना सत्यनायक म्हणाले, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून वरिष्ठांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि जनतेच्या पाठबळाचे प्रतीक आहे. याच जोरावर मी हा मान मिळवू शकलो. या पुढेही पोलीस अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

संतोष सत्यनायक यांनी ११ जानेवारी १९९९ रोजी पोलीस उपनिरीक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या २७ वर्षांत त्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर विविध पदांवर यशस्वी कामगिरी बजावली. ४ मे २०२१ रोजी त्यांना पोलीस उपअधीक्षक पदावर पदोन्नती मिळाली, तर सध्या ते बेळगाव येथे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या कारकिर्दीत अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास यशस्वीरित्या पूर्ण करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली २२ प्रकरणांमध्ये सुमारे ४७ लाख ९० हजार रुपयांचे ७१५.७९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करून संबंधितांना परत देण्यात आले. तसेच गणेशोत्सव, रमजान, बकरी ईद आणि बेळगावच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.दरम्यान यावेळी राज्यातील एकूण १५३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले असून त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील ७ जणांचा समावेश आहे.

निपाणीकरांनाअभिमान...

मूळचे संकेश्वर येथील आणि सध्या निपाणीत वास्तव्यास असलेले सत्यनायक यांनी निपाणी पोलीस सर्कलमध्येही उल्लेखनीय सेवा बजावली आहे. सन २०१९ मध्ये सीपीआय म्हणून कार्यरत असताना महापुराच्या संकटात तसेच सन २०२०- २०२१ मध्ये कोरोना काळात त्यांनी कोगनोळी टोल नाक्यावर प्रभावी कामगिरी करून माणुसकीचा आदर्श ठेवला.त्यांच्या या कार्यामुळे निपाणीकरांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान यावेळी राज्यातील एकूण १५३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले असून त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील ७ जणांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT