Nipani Bike Fire 
बेळगाव

Nipani Bike Fire: निपाणीत धावत्या दुचाकीला आग

सुदैवाने जीवितहानी नाही

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : येथील पार्वती कॉर्नरजवळ रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास धावत्या दुचाकीला अचानक आग लागल्‍याची घटना घडली. या घटनेत दुचाकी पूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

प्रदीप लंबे यांची ही दुचाकी असून मुलगा आरव याच्यासमवेत बाजारपेठेतून दुचाकीवरून (शिवबसव नगर) येथे घरी परतत असताना पार्वती कॉर्नरजवळ अचानक दुचाकीने पेट घेतला. दुचाकीने पेट घेतल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्‍यांना सावध केले. त्‍यामुळे त्‍यांनी तातडीने दुचाकी रस्त्याच्या बाजूला थांबवली.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT