Accident file photo
बेळगाव

Nipani Accident : मॉर्निंग वॉकरला वाहनाने चिरडले

निपाणीजवळील शाहूनगर वळणाजवळ अपघात

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या इसमाला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास निपाणीजवळील शाहूनगर वळणावर लोहार गॅरेजसमोर घडली. अशोक बाळू कांबळे (वय ५८, रा. जुने संभाजी नगर, निपाणी) असे मृताचे नाव आहे. ते गवंडी व्यावसायिक होते.

अशोक कांबळे रविवारी सकाळी मुरगूड भुयारी मार्गाच्या सर्व्हिस रोडवरून महामार्गावरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्‍यू झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला.

या घटनेची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी पोलिसांना माहिती दिली. उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी घटनास्‍थळी पाहणी करून पंचनामा केला. त्‍यांच्‍याजवळ असलेल्या मोबाईलवरून मृताची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली.

पोलिसांनी हिट ॲन्ड रन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहेत. याबाबत मयत कांबळे यांचा मुलगा अजित कांबळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्‍यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT