उमेश शिंदे 
बेळगाव

Nipani: निपाणीतील बेपत्ता व्यावसायिक सापडले

तब्बल ७६ दिवस शोध : कोल्हापूर बसस्थानक परिसरातून घेतले ताब्‍यात

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : शहरातील प्रतिभानगर परिसरातील बेपत्ता व्यावसायिक तब्बल ७६ दिवसांनी गुरुवार (दि. ७) रोजी कोल्हापूर येथील बसस्थानक परिसरात सुखरूप आढळून आले. सार्थक उमेश शिंदे (वय ४०) असे त्‍यांचे नाव आहे.

सार्थक शिंदे यांचे कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे कापड दुकान आहे. दि.१९ फेब्रुवारी रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी परतले होते. त्यांच्‍या पत्नी कामानिमित्त कोल्हापूर येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. रात्री फोन करून त्‍यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी घेण्यासाठी येतो, असे पत्‍नीला सांगितले होते. मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी घरी येउन पाहिले असता घरात दुचाकी, मोबाईल आणि चप्पल तशाच अवस्थेत होत्या.

तसेच तिजोरीतील साहित्य विस्कटलेले व रक्त लागलेली काठीही आढळली. त्यामुळे अपहरण किंवा घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या घटनेची माहिती मिळताच सीपीआय बी. एस. तळवार यांनी डीएसपी गोपाळकृष्ण गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.

दरम्यान, बेळगाव येथून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि विविध पुराव्यांच्या आधारे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी एलसीबी पथकाचे हवलदार शेखर असोदे, शिवानंद सारवाड, उमेश माळगे यांनी तीन राज्यांत तपास मोहीम राबविली. अखेर गुरुवारी कोल्हापूर बसस्थानक परिसरात सार्थक शिंदे सुखरूप आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. मानसिक तणावामुळे ते अचानक घरातून निघून गेल्याची माहिती सीपीआय बी. एस. तळवार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT