Nipani Mahalakshmi Temple Pudhari
बेळगाव

Nipani Mahalakshmi Temple : महालक्ष्मी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी

अष्टकलश स्नानजलाधिवास कार्यक्रम उत्साहात; वाजतगाजत गारवा, आंबील मिरवणूक

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : शहराचे ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती विधी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. भालचंद्र शास्त्री महाबळेश्वरकर, अमोल शास्त्री जोशी, उपेंद्र महाबळेश्वर, श्याम कानिटकर मुंबई, गुरुप्रसाद यरनाळकर व सहकाऱ्यांच्या पौरोहित्याखाली हे विधी झाले. यावेळी सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती महाराजांची प्रमुख उपस्थिती होती.

गुरुवारी वास्तुशांती अष्टकलश स्नानजलाधिवास, देवशय्या व होमहवन झाला. रात्री उशिरा देवीस उठवून ठेवण्यात आले. या विधीसाठी श्रीमंत दादाराजे देसाई निपाणीकर, साम्राज्यलक्ष्मी निपाणीकर, आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, महालक्ष्मी देवस्थान आणि अभिवृद्धी संघाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, तृप्ती शाह यांची उपस्थिती होती.

गुरुवारी शहरातील विविध गल्लींतून तसेच उपनगरातून वाजत-गाजत गारवा व आंबिल महालक्ष्मी नूतन मंदिरापाशी आणण्यात आली. यावेळी भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला होता. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. परिसरात पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT