Nipani house fire Pudhari
बेळगाव

Nipani house fire: निपाणीत घराला आग

शॉटसर्किटमुळे घटना; 2 लाखांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : गुरुवार पेठ येथील जुन्या काळातील घराला गुरुवारी सायंकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

हेमंत हात्रोटे यांच्या मालकीचे जुन्या काळातील लाकडी कडीपाटाचे दुमजली घर आहे. ते त्यांनी सराफ व्यावसायिक व सोन्याची कलाकुसर करणाऱ्या बंगाली कारागीरांना भाडेतत्त्वावर दिले आहे. गुरुवारी सायंकाळी दुसऱ्या मजल्यावर रूममध्ये अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्याने आग भडकली. गुरुवार आठवडी बाजाराचा दिवस असल्याने व आगीचे ठिकाणही मुख्य चौकात असल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचे निरीक्षक एल. एस. नांगनुरे यांनी बंबासह घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणले. आगीत 2 लाखांचे नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT