सौंदलगा : मांगुर फाट्यानजीक धिम्या गतीने वाहतूक Pudhari
बेळगाव

Nipani Flood Updates : निपाणीनजीक कोणत्याही क्षणी होणार एकेरी महामार्ग बंद

पुढारी वृत्तसेवा
मधुकर पाटील

निपाणी: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत मांगुर फाट्याजवळ कुंभार शेताजवळ महामार्गाला पर्याय म्हणून सुरू ठेवलेल्या सर्विस रोडवर वेदगंगेच्या नदीपात्रातील बॅक वॉटरचे पाणी आले आहे. कोणत्याही क्षणी कोल्हापूरहून बेळगावकडे होणारी वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. सध्या प्रशासनाने लहान वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे केवळ मालवाहतूक वाहने, बसेस वाहतूक सुरु आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास वेदगंगेच्या पाणी पातळीत वाढ होऊन दुपारपर्यंत बॅकवॉटरचे पाणी पर्यायी सर्विस रोडवर येऊन कोणत्याही क्षणी प्रशासनाला एकेरी वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. (Nipani Flood Updates)

दरम्यान, घटनास्थळी तहसीलदार एम. एन. बळीगार व डीएसपी गोपाळकृष्ण गौडर सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्या रस्ते देखभाल कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे, अक्षय सारापुरे यांच्यासह कर्मचारी या ठिकाणी लक्ष ठेव आहेत. शेतवडीतून पर्यायी सर्विस रोडवर येत असल्याने ही समस्या उद्भवली आहे.

या ठिकाणी सहा पदरीकरण कामाच्या दरम्यान भुयारी पुलाचे बांधकाम अर्धवट झाले असून पिलर टाकून पुलाचे बांधकाम झालेले नाही. केवळ विट भिंत उभा करून मुरमाचा भराव टाकल्याने ही समस्या उद्भवली आहे. येत्या काळात पश्चिमेकडून येणाऱ्या धरणातील पाणी वेदगंगेत सोडल्यानंतर पाण्याचा फुगवटा येऊन पश्चिमेकडील बाजूनेही पाणी आल्यानंतर महामार्ग बंद राहणार आहे. सद्यस्थितीत पूर्वेकडून ही समस्या उद्भवली आहे. यावर प्रशासन कोणता पर्याय मार्ग काढते. यावरच कोल्हापूरहून बेळगावकडे होणाऱ्या वाहतुकीचा प्रश्न अवलंबून आहे.

या हेल्पलाईन टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

दरम्यान मांगुर फाटा हद्दीत पूर्वेकडील बाजुने शेतवडीतून मोठ्या प्रमाणात पर्यायी सर्विस रोडवर पाणी येत असल्याने सीमाभागातून कागल, शिरोली, गोकुळ शिरगाव एमआयडीसीकडे जाणाऱ्या कर्मचाऱ्यासह नोकरवर्ग यांनी कामावर न जाता घराकडे परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारच्या सूचना स्थानिक प्रशासनान घटनास्थळी थांबून देत आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी मुळे पुराची भीती असून नदी काठावरील नागरिकास नागरिकांना अडचण असल्यास ०८३१-२४०७२९०,११२,०८३१-२४७४०५४ या हेल्पलाईन टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, तालुक्यातील चार ठिकाणच्या पर्जन्य मापकावर २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT