Belgaum Accident 
बेळगाव

Belgaum Accident : कंटेनरची ट्रकला धडक; वाहनांचे तुकडे

कणगल्याजवळ अपघात; सुदैवाने चालक बचावले, कोटीचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कणगला हद्दीत ग्लास फॅक्टरीसमोरील वळणावर भरधाव कंटेनरने पुढे निघालेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनाचे चालक किरकोळ जखमी झाले. या अपघातात दोन्ही वाहनाचे दोन तुकडे झाल्याने सुमारे कोटीचे नुकसान झाले.

दरम्यान, महामार्गावर उभारलेली लोखंडी स्वागत कमान दोन्ही वाहनांच्या धडकेत रस्त्यावर कोसळल्याने कोल्हापूरहून बेळगावला होणारी वाहतूक तब्बल दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. हा अपघात बुधवारी सकाळी झाला. घटनेची नोंद संकेश्वर पोलिसांत झाली आहे.

सूरज प्रजापती (वय ३०, रा. उत्तर प्रदेश) व राजू वडेटिनावर (वय ३७, रा. समर्थनगर, बेळगाव) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सूरज प्रजापती हा पुणे येथून बंगळूरकडे जात होता राजू वडेटिनावर ट्रक घेउन बेळगाव येथे जात होता. रस्ता उतारावर ट्रक आला असता चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक लोखंडी ग्रीलला धडक दिली. याचवेळी मागून येत असलेल्या कंटेनरची ट्रकला जोरात धडक बसली.

यावेळी दोन्ही वाहनाची धडक स्वागत कमानीला बसल्याने स्वागत कमान रस्त्यावर कोसळली. यामध्ये कंटेनर व ट्रकचे दोन तुकडे होत दोन्ही वाहने सुमारे २०० ते ३०० फूट फरफटत जाऊन थांबली. संकेश्वर पोलिस ठाण्याचे सीपीआय गणपती कोगनोळी यांनी घटनास्थळी भेट देउन पाहणी केली व जखमींना सरकारी महात्मा गांधी हलविले. त्‍यानंतर पुढील उपचारासाठी दोघांनाही बेळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. याबाबत अक्षय सारापुरे यांनी ट्रकचालकाविरोधात फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT