Bireswar Credit Society 
बेळगाव

Bireswar Credit Society : बिरेश्वरच्या मुख्यालयामुळे एकसंब्याच्या वैभवात भर

आज उद्‍घाटन, जाहीर सभा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राहणार उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा शनिवार दि. १९ रोजी एकसंबा दौऱ्यावर येणार आहेत. एकसंबा येथील बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या (मल्टिस्टेट) नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्‍घाटन व जाहीर सभेसाठी केंद्रीय मंत्री शहा यांचे आगमन होत आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक माजी खा. अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली.

या महत्त्वाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकसंबा येथे भव्य शामियाना उभारण्यात आला असून कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात शुक्रवारी सायंकाळी जोमाने सुरू होती. या कार्यक्रमाला देशभरातील आणि महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी असणार आहे. केंद्रीय शिक्षण आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलादमंत्री एच. डी. कुमारस्वामी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सी. नारायणस्वामी आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर हे प्रमुख मान्यवर या सभेला उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रम स्थळाच्या परिसरामध्ये ८ ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे तसेच उपस्थितांना व्यासपीठावरील चित्रण पाहायला मिळावे, यासाठी ४८ डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्याचे मुख्य संयोजक, जोल्ले ग्रुपचे संस्थापक आणि बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी चिकोडी लोकसभा मतदारसंघातील बँकेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

बिरेश्वर संस्थेची गरूडझेप

एकसंबा येथे १९९१ मध्ये स्थापन झालेल्या बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटीने अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रात गरूडझेप घेतली आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार संस्थेचे ४.६० लाखांहून अधिक सभासद असून संस्थेकडे ५,६६७ कोटीहून अधिक ठेवी आहेत. संस्थेने ४,०३८ कोटीपेक्षा जास्त कर्जवाटप केले असून संस्थेची एकूण उलाढाल १,७०० कोटीच्या पुढे गेली आहे. तसेच २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेने ५१.०४ कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT