निपाणी ः अक्कलकोट येथील स्वामी समर्थ पालखी पादुकांचे शुक्रवारी सकाळी निपाणी शहरात आगमन झाले. यावेळी शहर व परिसरातील हजारो भाविकांनी पालखी व पादुकांचे दर्शनाचा लाभ घेतला. आंदोलननगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात पादुका दर्शनासाठी नेण्यात आल्या होत्या. तेथेही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
शहर परिसरातील विविध भाविकांच्या घरी या पादुका भक्ती भावाने नेण्यात आल्या. कित्तूर चन्नम्मा सर्कलमधील राजमनी निवासासमोरील भव्य मंडपात पालखी विराजमान करण्यात आली. येथे माजी मंत्री वीरकुमार पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सामूहिक आरती करण्यात आली. प्रतीक शाह यांनी स्वागत केले. यावेळी अक्कलकोट अन्नछत्र मंंडळाचे उपाध्यक्ष अभयकुमार खोबरे, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, पंकज पाटील, राजेश कदम, रवींद्र कदम यांच्यासह मान्यवर तसेच राजमणी ग्रुप आणि निपाणी फुटबॉल ॲकॅडमीचे सदस्य आणि भाविक उपस्थित होते. यावेळी आयोजित महाप्रसादाचा सुमारे 500 भाविकांनी लाभ घेतला.
सायंकाळी बेडकिहाळ बँडच्या निनादात पालखीची शहराच्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आले. ही मिरवणूक चन्नम्मा चौक, अशोकनगर, कोठीवाले कॉर्नर, गुरुवार पेठ मार्गे व्यंकटेश मंदिरापर्यंत नेण्यात आली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखी व पादुकांचे दर्शन घेतले. व्यंकटेश मंदिर येथे सायंकाळी आयोजित महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.
शनिवारी पहाटे महाअभिषेक होणार आहे. येथून पादुका पालखी शिवाजीनगर समर्थ मंडळ व्यायाम शाळा येथील शरद थिटे यांच्या निवासस्थानी सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी नेण्यात येणार आहेत. यावेळी सचिन फुटाणकर, सोमनाथ शिंदे, कपिल शिंदे, ओंकार शिंदे, रणजित माने, करण माने, आशिष भाट, आकाश खवरे, अक्षय जयकर, गणेश घोडके, प्रशांत आजरेकर, राहुल निंबाळकर, संकेत पिसाळ, शरद थिटे, वेदांत गळतगे, दर्शना शाह, अमृता पाटील, ज्योती कदम आदी उपस्थित होते.