rain Pudhari Photo
बेळगाव

Nipani rain: निपाणी परिसरात वळवाचा कहर

शहर परिसराला गुरुवारी वळवाच्‍या पावसाने अक्षरश: झोडपले

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : शहर परिसराला गुरुवारी वळवाच्‍या पावसाने अक्षरश: झोडपले. दुपारी दोनच्या सुमारास तासभर तुफान पाऊस झाला. वादळी वार्‍यासह विजांच्‍या कडकडाटात पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले होते. दरम्यान, खबरदारी म्हणून हेस्‍कॉमने वीजपुरवठा खंडित केला होता. या पावसामुळे रबी सुगीवर मोठा परिणाम झाला असून, सखल भागात पाणीच पाणी साचून राहिले होते. तर अनेक मार्गांवर पाणी साचल्‍याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

दु. १ च्‍या सुमारास पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. वादळी वार्‍यामुळे डिजिटल बोर्ड झाडांच्या फांद्या कोसळण्‍याच्‍या घटना घडल्‍या. तसेच, अनेक घरांवील पत्रे व कौले उडून गेली. काही काळ विद्युतपुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे वीट भट्टीचे २ लाखांचे नुकसान झाले. तसेच, शहराबाहेरील भुयारी मार्गाला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवर पावसामुळे तळ्याचे स्वरूप आले. त्यामुळे वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT