बेळगाव

Nipani News : हायस्कूलच्या जतनासाठी सरसावले माजी विद्यार्थी!

दैनिक पुढारीत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल; मातृसंस्थेला गुरुदक्षिणा देणार

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : निपाणीचा शैक्षणिक वारसा असलेल्या शतक महोत्सवी म्युनिसिपल हायस्कूल इमारतीच्या जतनासाठी माजी विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. ‘म्युनिसिपल हायस्कूल जतन करा’ या मथळ्याखाली दैनिक पुढारीत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक माजी विद्यार्थ्यांनी मातृसंस्थेला गुरुदक्षिणा देण्याची तयारी दर्शविली आहे. या शाळेत ज्ञानदान केलेल्या शिक्षकांच्या मुलांनीही उपक्रमात योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

संस्थेचा ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांसाठी जतन व्हावा, या उद्देशाने शाळेचे प्रवेशद्वार आणि नामफलक उभारण्यासाठी आर्थिक योगदान देण्याबाबत माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमासंदर्भात सेवानिवृत्त शिक्षक मुतालिक यांचे पुत्र आणि महाराष्ट्रातील उद्योजक सुधीर मुतालिक (नाशिक) तसेच निवृत्त शिक्षक लक्ष्मण यादव यांचे पुत्र अभियंते केतन यादव (पुणे) यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

नगरपालिका प्रशासनाच्या परवानगीनंतरच पुढील कार्यवाही

उपक्रमासाठी नगरपालिका प्रशासनाची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतरच कामाचे स्वरूप, नियोजन आणि पुढील कार्यवाही निश्चित करण्यात येणार आहे. नगरपालिका प्रशासनाच्या नियमांचे पालन करूनच हा उपक्रम राबविण्यात येईल, असे माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT