निपाणी:तवंदी घाटात पलटी झालेला काच वाहतूक करणारा ट्रक 
बेळगाव

Nipani Accident | तवंदी घाटात काचवाहतूक ट्रक पलटी १० लाखाचे नुकसान ; चालक गंभीर

चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकचा अपघात

पुढारी वृत्तसेवा

निपाणी;पुढारी वृत्तसेवा पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावर हॉटेल व्हाईट हाऊसजवळ चालकाचा ताबा सुटल्याने काच वाहतूक ट्रक पलटी होऊन सुमारे १० लाखाचे नुकसान झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी घडला.घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे.विनोद नामदेव भक्तारे (वय २४) रा.नांदेड असे गंभीर जखमी चालकाचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की,ट्रकचालक विनोद भक्तारे हा कणगला येथील औद्योगिक वसाहतीतील काच कारखान्यातून काच (ग्लास) भरून राजस्थान (रायपूर) येथे जात होता.दरम्यान हा ट्रक घाटातील धोकादायक दुसऱ्या वळणावर आला असता चालकाचा ताबा सुटल्यामुळे तो रस्त्यातच पलटी झाला.त्यामुळे ट्रकमधील काच साहित्य सर्वत्र विखरून पडल्याने फुटून नुकसान झाले.

दरम्यान यावेळी चालक विनोद भक्तरे हा वाहनात अडकून पडल्याने गंभीर जखमी झाला.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना पाचारण करीत जखमी चालकाला सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी भेट देऊन पाहणी केली.या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT