Heroin smuggling pudhari photo
बेळगाव

Heroin smuggling: मुंबई-गोव्याहून हेरॉईन आणणारा तस्कर जेरबंद

मुंबई व गोवा येथून हेरॉईन आणून त्याची बेळगाव परिसरात विक्री करणाऱ्या संशयित तरुणाची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मुंबई व गोवा येथून हेरॉईन आणून त्याची बेळगाव परिसरात विक्री करणाऱ्या संशयित तरुणाची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तबरेज खतालसाब बसापुरी (वय 43, रा. खंजर गल्ली, सध्या रा. रुक्मिणीनगर) असे त्याचे नाव आहे. मार्केट पोलिसांत त्याच्यावर दोन गुन्हे असून त्याचा शोध सुरू होता. परंतु, तो स्वतःच न्यायालयात हजर झाला.

तबरेज हा फक्त बेळगाव पोलिसांनाच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा पोलिसांना हवा होता. गेल्या दोन वर्षांपासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गायब होत असे. हुबळी, धारवाड, बेळगावसह अनेक ठिकाणी त्याच्यावर गुन्हे आहेत. शिवाय महाराष्ट्रातील सांगली, मिरज येथेही तो अंमली पदार्थ विकत होता.

काही दिवसांपूर्वी मार्केटचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी हेरॉईन प्रकरणी एकाला अटक केली. तेव्हा त्याने तबरेजचे नाव घेतले होते. तेव्हापासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. परंतु, तो सापडत नव्हता. गोवा, महाराष्ट्रात आपल्या मागावर पोलीस आहेत, हे कळताच तो स्वतःहून नुकताच न्यायालयात हजर झाला. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT