Accident Pudhari
बेळगाव

Sambra accident: सांबऱ्याजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

दुचाकीची कारला धडक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव-बागलकोट रोडवरील सांबरा गावाजवळ दुचाकीची धडक कारला बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. 14 रोजी रात्री 12 च्या सुमारास घडली. सोहेल इम्तियाज देसाई (वय 26 रा.बाळेकुंद्री खुर्द) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. चुलत भावावर तलवार हल्ला झाल्याने त्याला पाहण्यासाठी तो बेळगावला आला होता. त्याला पाहून रात्री बाळेकुंद्री खुर्द या आपल्या गावी जात असताना हा अपघात झाला.

सोहेल याचा चुलत भावावर सुभाषनगर येथे तलवार हल्ला झाला. रात्री हा हल्ला झाल्याचे समजताच सोहेल हा त्याला पाहण्यासाठी आला होता. त्याला पाहून तो रात्री उशिरा बेळगावकडून बाळेकुंद्री खुर्दकडे चालला होता. यावेळी सांबऱ्याजवळ समोरून जाणाऱ्या कारला त्याच्या दुचाकीची धडक बसली. या घटनेनंतर काहीजणांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयाकडे हलविले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेची माहिती मिळताच मारिहाळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा करून त्यांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT