Vitthal Halgekar Pudhari
बेळगाव

Vitthal Halgekar: हेमाडगा रस्त्यावर झाड कोसळले, आमदार हलगेकरांनी स्वतः थांबून अडथळा केला दूर

वादळी वाऱ्यासह झालेल्या वळीव पावसामुळे खानापूर-हेमाडगा रस्त्यावरील मणतुर्गा क्रॉसवर जीर्ण झालेले झाड बुधवारी (दि. 1) सायंकाळी कोसळले

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : वादळी वाऱ्यासह झालेल्या वळीव पावसामुळे खानापूर-हेमाडगा रस्त्यावरील मणतुर्गा क्रॉसवर जीर्ण झालेले झाड बुधवारी (दि. 1) सायंकाळी कोसळले. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांच्या मदतीने झाड बाजूला करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

खानापूरमार्गे गोव्याला जोडणारा सर्वात जवळचा रस्ता असल्याने या मार्गावरुन वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे, झाड कोसळल्यानंतर काही मिनिटातच दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली. हेमाडगा, शिरोली भागातून विविध कामानिमित्त खानापूर शहरात आलेल्या प्रवाशांना आणि वाहनचालकांना झाड पडल्यामुळे ताटकळत थांबावे लागले. रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत असतानाही आमदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाला गती दिली.

वनखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांनी कार्यकर्त्यांसह तत्परता दाखवून अडथळा दूर करण्याच्या कामात हातभार लावला. त्यांच्या या कार्य तत्परतेमुळे लोकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गर्लगुंजी पीकेपीएसचे संचालक राजू सिद्धाणी, खानापूर विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, सूरज हलगेकर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT