Gyanendra Kumar | आयएएस अधिकारी बेपत्ता प्रकरणाला आता नवीन वळण; ज्ञानेंद्र कुमार आज कर्तव्‍यावर रूजू होणार 
बेळगाव

Gyanendra Kumar | आयएएस अधिकारी बेपत्ता प्रकरणाला आता नवीन वळण; ज्ञानेंद्र कुमार आज कर्तव्‍यावर रूजू होणार

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : कर्नाटक लोकसेवा आयोगामार्फत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीमधील घोटाळ्याची ‘ईडी’तर्फे चौकशी सुरू असतानाच आयएएस अधिकाऱ्याच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाला आता नवीन वळण आले आहे. ज्ञानेंद्र कुमार यांनी कौटुंबिक समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे तातडीने जाणे आवश्यक होते. त्यासाठी उत्तर प्रदेशाला आलो आहे. सोमवार दि. २४ रोजी बंगळूरला पोहोचणार असून, नेहमीप्रमाणे कर्तव्यावर रुजू होणार असल्याचे त्‍यांनी म्हटले आहे. त्यांना दिलेला सरकारी मोबाईल फोन बंद असून, ते सध्या खासगी मोबाईल वापरत आहेत.

दरम्यान, शिवशंकरप्पा साहूकर केपीएससीचे अध्यक्ष असतानाच्या काळात झालेल्या भरतीमधील घोटाळ्यातील आरोपांची ईडीची टीम चौकशी करत आहे. या काळात आयोगात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आयएएस अधिकारी ज्ञानेंद्र कुमार यांची चौकशी करण्यासाठी ईडीची टीम तयारी करत होती. यावेळी दिल्लीला जात असल्याचे सांगून ज्ञानेंद्र कुमार अचानक गायब झाले होते. त्यांनी आपला मोबाईल फोनदेखील बंद केला होता. त्यामुळे पोलिस त्यांचा शोध घेत होते.

दुसरीकडे या घोटाळ्याची चौकशी करणारी ईडी टीम चौकशी करण्यासाठी आयएएस अधिकारी ज्ञानेंद्र यांच्या निवासस्थानी जाऊन पाहणी केली आहे. जेव्हा अधिकारी ज्ञानेंद्र कुमार यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा सुरक्षा रक्षकाने मालक शहरात नसून त्यांचा मोबाईल फोन बंद आहे. तसेच, या घराची चावीदेखील माझ्याकडे नसल्याचे सांगितले. मात्र, अधिकार्‍यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ज्ञानेंद्र कुमार यांचे घर उघडून कागदपत्रांची तपासणी केली असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT