निपाणी : बेडकिहाळ- बोरगाव मार्गावर ऊसवाहून ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. मारुती जोतीराम सातपुते (वय 36, रा. कुपवाड रोड मिरज) असे मृताचे नाव आहे. हा अपघात बुधवारी दुपारी झाला. घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली आहे.
मारुती सातपुते आपले काम आटोपून बेडकिहाळ-बोरगाव रोडवरून जात होता. तो चौगुले मळ्याजवळ आला असता दुचाकीवरील ताबा सुटल्याने ऊसवाहू ट्रॅक्टरला मागून जोराची धडक बसली. यामध्ये मारुती डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत लागल्याने तो जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने पळ काढला. घटनास्थळी सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन बिरादार यांनी पाहणी करून मृताची ओळख पटवली.