बेळगाव : बेळगाव तालुक्यातील एका गावामधील युवकांनी अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याप्रकरणी त्या युवतीच्या पालकांनी टिळकवाडी पोलिस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी दोन युवकांना अटक केली असून त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
तालुक्यातील एका गावामधील युवकांनी अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. त्या अल्पवयीन युवतीवर एका युवकाने अत्याचार केल्यानंतर काही दिवसांनी दुसर्या युवकानेही तिला धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
त्या पीडितने ही घटना आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी टिळकवाडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर ते युवक पसार झाले होते. पोलिसांनी तपास करून याप्रकरणी दोन युवकांना अटक केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.