रामनगर, पुढारी वृत्तसेवा : गोवा येथून हैद्राबादच्या दिशेने जाणारा दारूसाठा रामनगर पोलिसांनी जप्त केला. बिस्कीट वाहतूक करणार्या टेम्पोतून दारूची वाहतूक करण्यात येत होती. याची माहिती जोयडा सीपी आय नित्यानंद पंडित यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शुक्रवार पहाटे पोलिस स्थानकासमोर वाहन थांबून तपासणी केली असता वाहनाच्या मागील बाजूस काही बॉक्समध्ये बिस्कीट तर काही बॉक्समध्ये गोवा बनावटीची दारू साडपली. वाहनासह 54 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सुमारे 140 बॉक्समध्ये 2 हजार,520 लिटर दारू सापडली. या दारूची किंमत अंदाजे 32 लाख 06 हजार 400 रुपये असून 2 लाख 51 हजारची बिस्किटे तसेच 20 लाखाचे वाहन असा एकूण 54 लाख 57, हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जोयडा सीपीअ नित्यानंद पंडित, संजय, मंजुनाथ, दर्शन आदी पोलिस कर्मचार्यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी कोटापल्ली नागाचारी (वय 35, रा. नलगोंड तेलंगणा) याला ताब्यात घेण्यात आले आहे.