Fine Pudhari
बेळगाव

KSRTC Fine : विनातिकीट प्रवाशांवर केएसआरटीसीची कारवाई

ऑगस्टमध्ये ४,८६२ प्रवाशांकडून ८.९० लाखांचा दंड वसूल; महसूल गळतीचीही तपासणी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात ऑगस्ट महिन्यात विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान ४ हजार ८६२ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून एकूण ८ लाख ९० हजार २७९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तपासणीदरम्यान तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर तिकीट देण्यातील अनियमितता आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महामंडळाच्या महसुलाला बसणारी गळतीही निदर्शनास आली. तपासणी पथकांनी १ लाख ३३ हजार ४४१ रुपयांची महसूल गळती शोधून काढली. महसूल गळतीसाठी जबाबदार संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध केएसआरटीसीच्या नियमानुसार विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

बसने प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाने बसमध्ये चढल्यानंतर नियमानुसार तिकीट घेतले आहे. प्रवासी पास जवळ आहे, याची खात्री करावी. विनातिकीट प्रवास करताना पकडल्यास दंड भरावा लागतो. अनावश्यक दंडात्मक कारवाई व गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकीट व पास घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन केएसआरटीसीने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT