Almatti Dam Water level
अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे.  Pudhari File Photo
बेळगाव

Almatti Dam | कोल्हापूर, सांगलीला दिलासा: अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविला

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. परिणामी धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. कृष्णा नदी परिसरातही संततधार सुरू आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. आज (दि. २५) दुपारी २ वाजता धरणातून २ लाख ७५ हजार क्युसेक सुरू केला जाणार असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. (Almatti Dam)

आज दुपारी २ लाख ७५ हजार क्युसेक सुरू

कृष्णा नदी (कल्लोल बॅरेज) आणि घटप्रभा नदी (लोलासूर पूल) येथून होणारा विसर्ग लक्षात घेता अलमट्टी धरणात पाण्याची मोठी आवक वाढत आहे. त्यामुळे नदीकडे जाणारा प्रवाह आज दुपारी २ वाजता २ लाख ७५ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार आहे. अलमट्टी धरणात येणाऱ्या आवकेच्या आधारे संध्याकाळी ५ वाजता विसर्ग ३ लाख क्युसेकपर्यंत वाढवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. (Almatti Dam)

SCROLL FOR NEXT