Bus Pudhari
बेळगाव

Bus driver incident: घरी जाण्यासाठी चालकाने बसच पळविली

घरी जाण्यासाठी कोणतेच वाहन न मिळाल्याने कल्याण कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळाचा चालक चक्क बसच घेऊन गेल्याची घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : घरी जाण्यासाठी कोणतेच वाहन न मिळाल्याने कल्याण कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळाचा चालक चक्क बसच घेऊन गेल्याची घटना नुकतीच सैदापूरमध्ये (जि. यादगीर) घडली. महिपाल रेड्डी असे त्याचे नाव आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, महिपाल रेड्डी सैदापूर आगारात कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी ड्युटी संपल्यानंतर त्याला राचनहळ्ळी गावी जाण्यासाठी कोणतेही वाहन मिळाले नाही. त्यामुळे, त्याने सैदापूर बसस्थानकावर उभी असलेली बस पळवून नेली. गावातील एका मंदिराजवळ बस उभी करून तो घरी गेला.

याबद्दलचे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल झाले. सदर घटनेचा पोलिसांनी तपास करून बस ताब्यात घेतली. या प्रकरणी सैदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून रेड्डीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल केकेआरटीसीने रेड्डीला बडतर्फ केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT