यल्लापूर : अपघातानंतर जखमींना बाहेर काढताना स्थानिक आणि पोलिस.  (Pudhari File Photo)
बेळगाव

Karwar Bus Accident | यल्लापूरजवळ तिघे ठार

परिवहनच्या बसने थांबलेल्या लॉरीला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे ठार तर सातजण जखमी झाल्याची घटना कारवार जिल्ह्याच्या यल्लापूरजवळ शुक्रवारी (दि. 15) रात्री घडली.

पुढारी वृत्तसेवा

कारवार : परिवहनच्या बसने थांबलेल्या लॉरीला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे ठार तर सातजण जखमी झाल्याची घटना कारवार जिल्ह्याच्या यल्लापूरजवळ शुक्रवारी (दि. 15) रात्री घडली. निल्लव्वा हरदोळ्ळी (वय 40 रा. बालकोट), गिरजव्वा बुदन्नावर (वय 30) आणि एक 40 वर्षीय व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

बागलकोटहून मंगळूरला परिवहन महामंडळाची बस जात होती. यल्लापूर घाटातील मावल्ली क्रॉसजवळ लॉरी नादुरुस्त झाल्याने रस्त्यावर थांबली होती. बसचालकाला लॉरी दिसले नसल्याने बसची जोरात धडक बसली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सातजण गंंभीर जखमी झाले. जखमींना हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यल्लापूर पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT