Life Imprisonment Pudhari
बेळगाव

Karwar murder case: मुलाचा खून करणाऱ्या वडिलांसह तिघांना जन्मठेप

प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली

पुढारी वृत्तसेवा

कारवार : मालमत्तेच्या वादातून आपल्या मुलाचा खून केल्याप्रकरणी वडील व दोन नातेवाईकांसह तिघांना शिर्सीतील (जि. कारवार) प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्या. किरण किणी यांनी हा निकाल दिला. पांडुरंग कित्तूरकर, अक्षय उर्फ आकाश कित्तूरकर व लता उर्फ तुळसाई कित्तूरकर अशी त्यांची नावे आहेत.

खटल्याची पार्श्वभूमी अशी, बिडोळ्ळीतील (ता. हल्याळ) केशव कित्तूरकर याचा खून झाला होता. पांडुरंग कित्तूरकर यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या केशवने मालमत्तेतील आपला वाटा मागितल्यावर त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपींनी त्याला मालमत्ता मिळू नये यासाठी कट रचून प्लास्टिकच्या दोरीने खाबांला बांधून घालून मारहाण करत खून केला.

हल्याळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक बी. एस. लोकापूर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. साक्षी, कागदोपत्री पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरविले होते. त्यानंतर वरीलप्रमाणे निकाल दिला. सरकारच्यावतीने ॲड. राजेश माळगीकर यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT