Elections 
बेळगाव

Karnataka News : जिल्हा-तालुका पंचायत निवडणुका तयारीला वेग

आरक्षणाचे प्रमाण जाहीर : बेळगाव जि. पं. साठी ९० पैकी ४५ जागा महिलांसाठी

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : आगामी काळात ग्रामीण भागातील राजकारण गतिमान होणार आहे. सहा वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत मतदारसंघासाठी आरक्षणाचे प्रमाण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असून अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय अ व ब आणि सामान्यांसाठी आरक्षणाचे प्रमाण बुधवारी राजपत्रात जाहीर करण्यात आले.

बेळगाव जिल्ह्यात ९० मतदारसंघ असून यापैकी ४५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी ११ जागा असून यापैकी ६ जागा महिलांसाठी, अनुसूचित जमातींसाठी ७ जागा असून यापैकी ४ महिलांसाठी, मागासवर्गीय अ गटासाठी २२ जागा असून महिलांसाठी ११, मागासवर्गीय ब गटासाठी ५ जागा असून यापैकी ३ जागा महिलांसाठी तर सामान्यांसाठी ४५ जागा असून यामध्ये २१ जागा महिलांसाठी राखीव आहेत.

तालुका पंचायतीसाठीही आरक्षणाचे प्रमाण जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ ता. पं. मध्ये एकूण ३०१ जागांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये १५४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर अनुसूचित जागीसाठी ३७ जागा असून २१ जागा महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी २८ जागा असून यापैकी २० जागा महिलांसाठी, मागासवर्गीय अ गटासाठी ६८ जागा असून त्यापैकी ३९ महिलांसाठी मागासवर्गीय ब गटासाठी १४ जागा असून यापैकी ६ जागा महिलांसाठी तर सामान्यांसाठी १५४ जागा असून ६८ जागा महिलांसाठी राखीव आहे.

राज्यात तालुका पंचायतीसाठी ३६५६ जागा असून त्यामध्ये १९०५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ७३३ जागा असून त्यामध्ये ४२९ महिला, अनुसूचित जमातीसाठी ३९४ जागा असून महिलांसाठी २८७, मागास अ साठी ५०८ जागा असून महिलांसाठी ३०६, मागास ब साठी १११ जागा असून महिलांसाठी ६४ तर सामान्यांसाठी १९१० जागा असून ८१९ महिलांसाठी राखीव जागा आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT