Murder  Pudhari
बेळगाव

Karnataka Crime: विजापुरात दिवसाढवळ्या फायनान्स व्यावसायिकाचा खून

विजापूर शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या निर्घृण खुनाने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे

पुढारी वृत्तसेवा

अंकली : विजापूर शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या निर्घृण खुनाने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील मुबारक चौक परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी एका फायनान्‍स व्‍यावसायिकावर कोयत्याने सपासप वार करून आणि त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला.

त्‍यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले. शरणू मल्लेशप्पा जिवरगी (वय ४८, रा. कालिकानगर, विजापूर) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शरणू जिवरगी हे फायनान्स व्यवसाय करत होते. नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी पिग्मीची रक्कम गोळा करण्यासाठी ते मुबारक चौक परिसरात आले असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून त्यांचा निर्घृण खून केला. या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच गोलगुंबज पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद गोलगुंबज पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT