Drowning Death Pudhari Photo
बेळगाव

Drowning Death: ओढ्यात बुडून जुळ्या भावांचा मृत्यू

शिर्सी तालुक्यातील घटना : खोल पाण्‍यात बुडाले

पुढारी वृत्तसेवा

कारवार : ओढ्यात पोहताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे जुळ्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १२) दुपारी कारवार जिल्ह्यातील उंचल्लीजवळील मस्तिजड्डीत (ता. शिर्सी) घडली. पवन (रा. कुमठा) व लोहित (रा. मस्तिजड्डी) अशी मृतांची नावे असून ते जुळे भाऊ होते.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पवन व लोहित फिरण्यासाठी ओढ्याकाठी गेले होते. पण, ओढ्यात पोहण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. ओढ्यात पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, अग्निशामक दल, आपत्कालीन सेवा दल तसेच श्री मारिकांबा लाईफगार्ड्‌सच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरु केली. अथक प्रयत्नांनंतर दोन्ही भावांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे पवन व लोहित यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT