Accident  
बेळगाव

Karnataka Accident: ट्रकने २५ मेंढ्यांना चिरडले

ढोणेवाडीतील मेंढपाळांचे ८ लाखांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

कारदगा : मिरज-बेडग मार्गावर ट्रक मेंढ्यांच्या कळपात घुसल्याने २५ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला तर २५ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. शनिवारी घडलेल्‍या घटनेत मेंढपाळाचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देउन तातडीने एक लाख रुपयांची मदत जाहीर केली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ढोणेवाडी (ता. निपाणी) येथील मेंढपाळ महादेव दुगाणे व मलकारी दुगाणे, विठ्ठल दुगाणे, बाळू हजारे, मरगू दुगाणे, गौडा हजारे आदी मेंढ्यांचा कळप घेऊन मिरज-बेडग रस्त्याने मिरजेच्या दिशेने जात होते. यावेळी आरगकडून येणाऱ्या १६ चाकी ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात थेट रस्त्याकडेला असलेल्या मेंढ्यांच्या कळपात घुसला. ट्रकखाली सापडून २५ मेंढ्या जागीच ठार झाल्यातर २५ मेंढ्यासह दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या.

या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‌या घटनेची माहिती समजताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाहणी करुन धनगर बांधवांना धीर दिला. आ. गोपीचंद पडळकर व आ. सुरेश खाडे यांनी एक लाख रुपये मदत मिळवून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT