Sri Sri Ravi Shankar 
बेळगाव

Art of Living Trust: आर्ट ऑफ अतिक्रमण?

चौकशीसाठी बिश्वास यांच्या नेतृत्वाखाली ११ जणांचे पथक

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गुरु श्री श्री रविशंकर यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेला चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग' आणि तिच्या संलग्न संस्थांनी बंगळूरमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनींवर अतिक्रमण केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक विशेष तपास पथक तयार केले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार, महसूल खात्याने वरिष्ठ आयएएस अधिकारी आदित्य अमलान बिश्वास यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन केले असून, यामध्ये ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बंगळूर जिल्ह्यातील बंगळूर दक्षिण तालुका, कग्गलीपूर आणि आसपासच्या गावांमध्ये सरकारी पशुपालन केंद्रांसह शेकडो एकर जमिनीवर 'आर्ट ऑफ लिव्हिंग' आणि तिच्या संलग्न संस्थांनी अतिक्रमण केल्याटा आरोप आहे. १९८१ मध्ये स्थापन झालेल्या संस्थेचे विश्वस्त आणि इतर व्यक्तींनी वेगवेगळ्या करारांच्या माध्यमातून २९० एकरहून अधिक सरकारी गायरान जमिनी'वर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अतिक्रमण केले आहे. कग्गलीपूरमधील सर्व्हे क्रमांक १५० मधील तलावाचा परिसर, दोन नाले, राजकालवे आणि जमिनींवरही अतिक्रमण केले आहे. त्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केलेल्या आरोपांवर सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, बंगळूर विभागीय आयुक्तांनी अहवाल सादर केला आहे. त्यात म्हटले आहे या संस्थांनी २९० एकर जमिनीवर अतिक्रमण केले असून, संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करण्यामध्ये अडथळा आणला आहे.

याव्यतिरिक्त, आरोपींनी त्यांच्या पत्त्यात उल्लेख केलेले ‘उदयपूर’ नावाचे कोणतेही अधिकृत 'महसुली गाव' अस्तित्वात नाही. हे नाव कग्गलीपूर गावाच्या काही भागांसाठी वापरले जाते आणि सीमांच्या अस्पष्टतेमुळे अचूक सर्वेक्षणात अडथळा निर्माण झाला आहे, असे त्यांनी म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT