Bribe Case Pudhari
बेळगाव

Karnataka Bribe Case: लाच स्वीकारताना महसूल निरीक्षकाला अटक

भूमी दाखला विभागाचे काम करण्यासाठी शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना एका महसूल निरीक्षकाला लोकायुक्तांनी अटक केली

पुढारी वृत्तसेवा

मंड्या : भूमी दाखला विभागाचे काम करण्यासाठी शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना एका महसूल निरीक्षकाला लोकायुक्तांनी अटक केली. रविवारी (दि. १४) हलगोरु (जि. मंड्या ता. मळवळ्ळी) येथे ही कारवाई केली. आर. आय. मधुसुदन असे त्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, महसूल निरीक्षक मधुसूदनने भूमी दाखला विभागाचे काम करण्यासाठी शेतकरी नंजुंडस्वामी यांच्याकडे एकूण दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान १० हजार रुपये आगाऊ रक्कम घेत असताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी हलगोरु सापळा रचून अटक केली. या प्रकरणी मळवळ्ळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT