Prajwal Revanna 
बेळगाव

Prajwal Revanna : सुंभ जळाला तरी पीळ जाईना..!

तुरुंगात प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये सापडले अश्लिल व्हिडिओ

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : लैंगिक छळाच्या प्रकरणात तुरुंगवास भोगत असूनही माजी खासदार प्रज्वल रेवण्णाने आपली वागणूक सुधारलेली नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. कारागृहात त्याच्या मोबाईल आणि एका पेन ड्राईव्हमध्ये शंभरहून अधिक व्हीडीओ सापडले असून त्यापैकी अनेक अश्लिल आहेत, असा अहवाल समोर आला आहे.

पोलिसांनी तुरुंगात प्रज्वल रेवण्णा वापरत असलेला मोबाईल फोन जप्त करून तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवला होता. आता या तपासणीचा अहवाल समोर आला असून, त्यातून प्रज्वल रेवण्णाचे एक वेगळेच रूप उघड झाले आहे.

तुरुंगात सापडलेल्या मोबाईल फोनचा वापर करून प्रज्वल रेवण्णाने अनेक व्यक्तींशी संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे. काही महिलांशी व्हिडिओ कॉल्स आणि व्हॉट्सॲप कॉल्सद्वारे संवाद साधल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे, प्रज्वल रेवण्णाने संपर्क साधलेल्या महिलांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. पोलीस सध्या कॉल तपशील, मोबाईल डेटा आणि पेन ड्राइव्हमधील माहितीची तपासणी करत आहेत. प्रज्वल वापरत असलेल्या मोबाईल फोनमध्ये एकूण १७३ फाइल्स सापडल्या, तर पेन ड्राइव्हमध्ये १०० हून अधिक व्हिडिओ आढळले. मोबाईल फोनमध्ये कन्नड, हिंदी आणि इंग्रजी चित्रपट व वेब सिरीजसह विविध व्हिडिओ असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पेन ड्राइव्हमध्ये १०० हून अधिक व्हिडिओ सापडले असून, त्यात अश्लील मजकुराचाही समावेश असल्याचे अहवालात म्हटले आहे. प्रज्वल रेवण्णा आपल्या कोठडीतील टीव्हीवर व्हिडिओ पाहत होता असे समजते; तसेच मोबाईल फोन आणि पेन ड्राइव्हमध्ये सापडलेल्या व्हिडिओंबाबतही तपास सुरू आहे. पेन ड्राइव्हमधील अश्लील व्हिडिओ तपासणीसाठी एसआयटीकडे सोपवण्याची तयारी पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT