बेळगाव

Karnataka Politics : कर्नाटकात तीन उपमुख्यमंत्रिपदे !

दिनेश चोरगे

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळविण्यासाठी तीन उपमुख्यमंत्र्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचा दावा सहकारमंत्री राजण्णा यांनी केला होता. त्याचे जोरदार पडसाद राज्य काँग्रेसमध्ये उमटत आहेत. इच्छुकांच्या आकांक्षांना धुमारे फुटले आहेत. (Karnataka Politics)

मंत्री राजण्णा यांच्या वक्तव्याचे जोरदार समर्थन करत गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांनी या वक्तव्याकडे पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने पाहावे, असे म्हटले आहे. वेगवेगळ्या जातीधर्माच्या मतदारांना जोडण्यासाठी वेगवेगळ्या जातीधर्माच्या नेत्यांना उपमुख्यमंत्रिपदी संधी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. (Karnataka Politics)

डॉ. परमेश्वर म्हणाले, उपमुख्यमंत्रिपद मिळणार असेल, तर कोणीही ते नाकारणार नाही. मला जर मिळणार असेल, तर मी त्यासाठी इच्छुक आहे. विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जाती, जमाती, लिंगायत, अल्पसंख्याक समाजातील मतदार काँग्रेसबरोबर ठामपणे उभे राहिले. त्या समाजांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. पक्षांतर्गत वाद असल्यास त्यावर पक्षाच्या हायकमांडचा निर्णय अंतिम असतो. पक्षाध्यक्षांचा निर्णय आम्ही मानू. त्याचबरोबर पक्षाने अतिरिक्त जबाबदारी दिल्यास तीदेखील आनंदाने स्वीकारू, अशीही माहिती त्यांनी दिली. (Karnataka Politics)

SCROLL FOR NEXT