बेळगाव

karnataka News : विद्युत टॉवरवर चढून मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा

विजापुरातील घटना : चार तासांनंतर सुटका

पुढारी वृत्तसेवा

विजापूर : मद्याच्या नशेत एका तरुणाने ११० केव्ही क्षमतेच्या विद्युत टॉवरवर चढून धिंगाणा घातल्याची घटना विजापूर शहराबाहेरील बेगम तलाव परिसरात घडली. शिवगिरी येथून विजापूर शहराला वीजपुरवठा करणाऱ्या ११० केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहिनीच्या टॉवरवर चढून त्‍याने गोंधळ घातला. कौजलगी तांडा येथील रवी राठोड असे त्‍याचे नाव आहे.

मद्यसेवन करून नशेत असलेला रवी सायंकाळी बेगम तलाव परिसरातील वीज टॉवरवर चढल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर जलनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान आणि हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

सुमारे ४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रवीला सुरक्षितपणे टॉवरवरून खाली उतरविण्यात यश आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला प्राथमिक उपचारांसाठी विजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT