Murder Case Pudhari
बेळगाव

Karnataka Murder Case: बहिणीकडून भावाचा खून

कौटुंबिक वादातून बहिणीने सख्ख्या भावाचा निर्घृण खून

पुढारी वृत्तसेवा

विजापूर : कौटुंबिक वादातून बहिणीने सख्ख्या भावाचा निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी सायंकाळी विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यात हलसंगी क्रॉसजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. बाबुसा महादेव जमादार (वय ३५, रा. हलसंगी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या घटनेत आप्पासाहेब मुंकासे हे गंभीर जखमी झाले असून त्‍यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. मृत बाबुसा यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी सख्खी बहीण मीनाक्षी भतगुणकी (जमादार) यांनी स्वतःची मुलगी सत्यव्वा हिच्याशी लावून दिला होता. पण विवाहानंतर बाबुसा आणि पत्नी सत्यव्वा यांच्यात किरकोळ कारणांवरून वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात येते.

शनिवारी सायंकाळी बाबुसा हे हलसंगी क्रॉस येथील बहिणीच्या घरी गेले असता पुन्हा कौटुंबिक वाद उफाळून आला. यावेळी संतापलेल्या बहिणीसह कुटुंबीयांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बाबुसा जमादार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद झळकी पोलिस ठाण्यात झाली आहे. डीएसपी सुलफी, सीपीआय परशुराम मनगुळी आणि उपनिरीक्षक मंजुनाथ तिरकन्नवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT