बेळगाव

Karnataka MLC Election : कर्नाटक विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १३ जून रोजी मतदान

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Karnataka MLC Election : कर्नाटक विधानपरिषदेच्या ११ जागांवरील १३ मे रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केला.

कर्नाटक विधानपरिषदेतील अरविंद कुमार अरळी, एन.एस. बोसेराजू, के. गोविंदराज, डॉ. तेजस्विनी गौडा, मुनिराजू गौडा, के.पी. नानजुंडी विश्वकर्मा, बी. मी फारुख, रघुनाथराव मलकापुरे, एन. रवी कुमार, एस. राद्रगौडा, के हरीश कुमार या ११ सदस्यांचा कार्यकाळ १७ मे २०२४ संपल्यामुळे या जागा रिक्त होत आहेत. त्या भरण्यासाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला.

निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, २७ मे रोजी अधिसूचना जारी होणार आहे. त्यानंतर उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३ जून असेल, तर १३ जून रोजी मतदान होऊन त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे.

SCROLL FOR NEXT