Karnataka landslide: भूस्खलनात मातेसह दोन मुलांचा मृत्‍यू  File Photo
बेळगाव

Karnataka landslide: भूस्खलनात मातेसह दोन मुलांचा मृत्‍यू

संततधार पावसाने घरावर डोंगर कोसळला; बिहारच्या कामगार कुटुंबावर घाला

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात मातेसह तिची दोन मुले जिवंत गाडली गेली. ही घटना मंगळूर येथील कंकनाडी येथील नागुरीजवळ घडली. मृत झालेले सर्वजण मूळचे बिहारचे असून मंगळूरमध्ये बांधकाम मजूर म्हणून काम करत होते.

मंगळूर परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. सततच्या पावसामुळे, नागुरीतील कंकनाडी शहर पोलिस स्टेशनजवळच्या एका जुन्या घरावर जवळच्या डोंगरावरून मातीचा ढिगारा कोसळला. यामध्ये तिघेजण गाडले गेले.

अचानक झालेल्या भूस्खलनामुळे घरातील चौघेजण क्षणार्धात ढिगाऱ्याखाली अडकले. यामध्ये आई आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी आणि बचाव पथकाने घरातील उर्वरित लोकांना सुखरूप बाहेर काढले.

या घटनेची बातमी कळताच अग्‍निशमन दल, एसडीआरएफ आणि पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने घरावर कोसळेला मातीचा ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. मुसळधार पावसात बचाव पथके बचावकार्य करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT