कारवार : सरकारी वसतीगृहाच्या स्वच्छतागृहात बाळाला जन्म देऊन ते बाहेर फेकल्याची घटना शिर्सी तालुक्यातील तोडगड्डेत नुकतीच घडली. स्वच्छतागृहाबाहेर अर्भक पडल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्याने वार्डनला कळविल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
बाळाला जन्म देणारी मुलगी मृत्युमुखी पडली असून बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकाऱ्यांनी तातडीने वसतीगृहाला भेट दिली. बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिर्सी ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.