Raid Pudhari
बेळगाव

Karnataka Lokayukta Raid : हेस्कॉम अभियंत्याकडे २.५२ कोटींचे घबाड

लोकायुक्तांच्या छाप्यात १.७९ रोख व ७३.७१ लाखांचे दागिने सापडले

पुढारी वृत्तसेवा

धारवाड : हुबळी-धारवाडमध्ये भ्रष्टाचार आणि उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरुन लोकायुक्तांनी हेस्कॉमचे साहायक कार्यकारी अभियंता किरणकुमार बैंदूर व त्यांच्या घरासह कार्यालय आणि संबंधित ठिकाणांवर लोकायुक्तांच्या पथकाने एकाचवेळी छापेमारी करत कागदपत्रांची तपासणी केली होती. या छाप्यात १.७९ कोटी रुपये रोख व ७३.७१ लाख रुपये सोन्याचे दागिने सापडल्याची प्राथमिक माहिती आहे.

धारवाड लोकायुक्त पोलिस अधीक्षक सिद्धलिंगप्पा यांच्या नेतृत्वाखाली बैंदूर व त्यांच्या पत्नीच्या निवासस्थानी, हेस्कॉम कार्यालयासह चार ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. लोकायुक्त पथकाने घर आणि कार्यालयातील मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि इतर नोंदींची तपासणी केली.

संबंधित अधिकाऱ्याने आपल्या ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत अधिक मालमत्ता जमवली आहे का, याचा तपास केला जात आहे. कागदपत्रांच्या सखोल तपासानंतर अवैध मालमत्तांचे मूल्य वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT