Gram Panchayat Election file photo
बेळगाव

Karnataka Gram Panchayat Elections : गावगाड्यात रंगणार राजकारणाचा फड

ग्राम पंचायतींचे आरक्षण जाहीर : इच्छुकांची धावपळ सुरु, लगबग वाढणार

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : राज्यातील तालुका, जिल्हा पंचायतींचे मतदारसंघनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर ग्राम पंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे आगामी काळात गावगाड्यात राजकारणाचा फड रंगणार आहे. ऐन सुगीच्या हंगामात निवडणुकीची तयारी सुरु होणार असून इच्छुकांची धावपळ वाढणार आहे. बेळगाव तालुक्यातील ग्राम पंचायतींचे आरक्षण जाहीर झाले आहे. आता इच्छुकांच्या नजरा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याकडे लागून राहिल्या आहेत.

ग्राम पंचायतींची मुदत जानेवारीत संपली असून सर्वत्र प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून गावांचा कारभार सुरु आहे. त्यामुळे निवडणुका घेण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार आरक्षण जाहीर झाले आहे. काही दिवसांपूर्वी तालुका आणि जिल्हा पंचायतींचेही आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे येत्या काळात गावागावात राजकारण ढवळून निघणार असून इच्छुकांची लगबग वाढणार आहे.

ग्राम पंचायतीची निवडणूक थेट पक्षांच्या चिन्हावर घेण्यात येत नाही. परंतु, लोकप्रतिनिधी प्रत्येक ग्राम पंचायतींमध्ये आपल्या समर्थकांना संधी देत सक्रिय राहतात. ग्रामीण भागातील राजकारणावर वर्चस्व ठेवण्यासाठी ग्राम पंचायतींची निवडणूक प्रत्येक राजकीय पक्षांना महत्त्वाची वाटते. यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT