बेळगाव

Karnataka Prisoner Escape : हिंडलग्यातील कैदी धारवाडमधून पसार; न्यायालय आवारात पोलिसांच्या हातावर तुरी

धारवाड जिल्हा न्यायालयाच्या आवारात चहाच्या बहाण्याने एक कैदी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला

पुढारी वृत्तसेवा

धारवाड : धारवाड जिल्हा न्यायालयाच्या आवारात चहाच्या बहाण्याने एक कैदी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. अरबाज दोडमणी असे त्याचे नाव असून, तो बेळगावच्या हिंडलगा तुरुंगात होता. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यासाठी आणले गेले होते.

न्यायालयाच्या आवारात पोचल्यानंतर अरबाझने पोलिसांना सांगितले की, त्याला चहा प्यायचा आहे. त्याला चहा पिण्यासाठी एका दुकानात नेण्यात आले. मात्र त्याला चहा पिता आला नाही. कारण त्याच्या हातात बेड्या होत्या. चहा पिण्यासाठी बेड्या काढण्याची विनंती केल्यानंतर पोलिसांनी बेड्या काढल्या. त्याबरोबर आधीच दुचाकीवर सज्ज असलेल्या सहकाऱ्याच्या मदतीने त्याने पळ काढला.

अरबाजवर मारामारीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. ही घटना धारवाड उपनगरीय पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिस फरारी अरबाझचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT